Ad will apear here
Next
देशातील २५० ग्रामीण शाळांमध्ये सुरू होणार वाचनालये; पुण्यातून झाली सुरुवात
‘वाय फॉर डी’ फाउंडेशनचा उपक्रम
‘वाय फॉर डी’ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार निकम, उपाध्यक्ष ब्रिजेश कुमार, अपूर्व दोंडे, रामेश्वर फुंडीपल्ले, श्वेता नाईक, शुभम धरमाळे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक

पुणे : ग्रामीण भागातील मुलांना चांगली वाचनीय पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने पुण्यातील ‘वाय फॉर डी’ फाउंडेशनच्या वतीने ‘बुक फॉर पर्पज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील २५० शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन झाले. पुणे जिल्ह्यातील दोन शाळांमध्येही या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालय आणि कोळवणमधील न्यू इंग्लिश स्कूल या दोन शाळांमधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी ‘वाय फॉर डी’ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार निकम, उपाध्यक्ष ब्रिजेश कुमार, अपूर्व दोंडे, रामेश्वर फुंडीपल्ले, श्वेता नाईक, शुभम धरमाळे आदी उपस्थित होते. या वेळी या दोन्ही शाळांना प्रत्येकी २०० पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. यामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच आत्मचरित्रे, माहितीपर पुस्तके, विज्ञान, इतिहास, गोष्टी यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे. 


या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रफुल्लकुमार निकम म्हणाले, ‘वाय फॉर डी’ ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी सामाजिक संस्था असून, हाँगकाँग येथील सर्जन चॅरिटी ट्रस्टच्या साह्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात नुकतीच या उपक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अनेक कुटुंबांची हलाखीची आर्थिक परिस्थिती, तसेच शिक्षणाच्या प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव यांमुळे आजही ग्रामीण भागातील मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून जगाच्या खिडक्या खुल्या करून देण्याचा आमचा उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडून याचा उपयोग त्यांना भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी होईल.’

‘वाय फॉर डी फाउंडेशन’ या संस्थेचे काम देशातील २२ राज्यांमध्ये चालते. महिला आणि युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, पर्यावरण संवर्धन, आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, शाळांचे डिजिटायजेशन, समृद्ध किसान, कृषी गुरुकुल, ‘सशक्त बालक, सशक्त भारत’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून होत असते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXWCB
Similar Posts
रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद पुणे : एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने १२ डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथालयविषयक कार्यशाळा (लायब्ररी एक्सटेन्शन अॅक्टिव्हिटी) मावळ तालुक्यातील चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आली.
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
कौशल्यविकासातून समृद्धीकडे; वैशाली नाईक बनली यशस्वी फॅशन डिझायनर पुणे : राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन १५ जुलै २०१९ रोजी साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ देशातील खूप जणांनी घेतला आहे. पुण्यातील वैशाली नाईक या तरुणीनेदेखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याला नवा आकार दिला आहे.
पुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुणे : सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. त्या वेळी अवघ्या महाराष्ट्राने आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी खाण्याच्या वस्तू, धान्य, कपडे, औषधे अशा विविध प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला. पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन थोडा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language